
शाहरुख खान आणि गौरी खान हे कपल संपूर्ण बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रेमाच्या कथा आजही तरुण पिढी तेवढ्याच आतुरतेने ऐकते. जवळ काहीही नसताना शाहरुखने गौरीला मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आजही बॉलिवुडच्या जगात चर्चेचा विषय असतो.

शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. मात्र अजूनही ते दोघे एकमेकांवर एखाद्या नव्या कपलप्रमाणेच प्रेम करतात. गौरी खान आज 54 वर्षांची आहे. तरुणपणात मात्र ती वेगळीच दिसायची. तिचे तरुणपणाचे अनेक फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

काही फोटोंमध्ये गौरी खान ही शाहरुख खानसोबत दिसते. काही फोटोंमध्ये हे दोघे पार्टीमध्ये दिसतात. तर काही फोटोंत हे दोघेही मस्ती करत असलेले पाहायला मिळतात. हे जुने फोटो पाहून शाहरुखसोबत उभी असलेली मुलगी गौरी खानच आहे, याच्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही.

दरम्यान, आज गौरी खान एक निर्माती आहे. ती एक इंटेरियर डिझायनरदेखील आहे. गौरी आणि शाहरुख एकमेकांवर खूप प्रेम करतात. विशेष म्हणजे या दोघांचे त्यांच्या मुला-मुलीवरही खूप प्रेम आहे.

गौरी आणि शाहरुख यांना एकूण तीन आपत्य आहेत. यातील आर्यन खान, सुहाना खान नेहमीच चर्चेत असतात. आर्यन खानने दिग्दर्शित केलेली एक वेब मालिका नुकतीच आलेली आहे. या वेब मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.