
देठाचा रंग : केमिकलने पिकवलेल्या केळीचे देठ गडद हिरवे असतो, पण केळी मात्र पूर्ण पिवळी धमक दिसते. तर नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठ आणि केळी दोन्ही हळूहळू पिवळी किंवा काळपट पडतात.

सालीचा रंग : केमिकलने पिकवलेली केळी लिंबासारखी पिवळी धमक आणि दिसायला खूप आकर्षक असतात. मात्र नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा रंग फिकट पिवळा असतो.

काळे ठिपके : केळी नैसर्गिकरित्या पिकली की त्यावर नैसर्गिक काळे ठिपके येतात. केमिकलने पिकवलेल्या केळ्यांवर असे ठिपके नसतात, ती पूर्णपणे स्वच्छ आणि पिवळी दिसतात.

केळीची चव : केमिकलने पिकवलेली केळी खाताना ती कमी गोड लागतात आणि काही वेळा त्यांची चव किंचित तुरट किंवा कडू असू शकते. नैसर्गिक केळी अत्यंत गोड आणि रसाळ लागतात.

पाण्यातील चाचणी : एक बादली पाणी घेऊन त्यात केळी टाका. जर केळी पाण्यावर तरंगली, तर ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत. जर केळी पाण्याच्या तळाला गेली, तर समजून जा की ती केमिकलने पिकवलेली आहेत (कारण केमिकल्समुळे केळीचे वजन वाढते).