
पहिल्या क्रमांकावर डुकराचे मांस : चीनमध्ये डुकराचे मांस हे आहारातील मुख्य घटक आहे. तिथे 'मांस' या शब्दाचा अर्थ अनेकदा केवळ डुकराचे मांस असाच घेतला जातो. एकूण मांस वापरापैकी निम्म्याहून अधिक वाटा याच मांसाचा असतो.

चिकन : डुकराच्या मांसानंतर चिकनचा क्रमांक लागतो. स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये चिकनचा मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.

मासे आणि समुद्री जीव : चीनला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभल्यामुळे मासे, कोळंबी, खेकडे आणि इतर समुद्री जीवांचा आहारात समावेश असतो. जगातील सर्वाधिक मासे खाणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे.

बदकाचे मांस : चीनमध्ये बदकाचे मांस अत्यंत लोकप्रिय आहे, विशेषतः 'पेकिंग डक' हा त्यांचा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे.

बीफ आणि मटण : चीनममध्ये गायीचे आणि शेळी/मेंढीचे मांस देखील खाल्ले जाते, मात्र डुकराच्या मांसाच्या तुलनेत याचे प्रमाण कमी आहे. उत्तर चीनमधील मुस्लीम समुदायामध्ये मटण अधिक लोकप्रिय आहे.