Gold Price Today : दुपार होताच सोनं कडाडलं, चांदीचे दरही… युद्धाच्या काळातील भाव काय? आता खरेदी करणं…
Today Gold Price 27 March 2026 in Marathi : युद्धामुळे असलेला तणाव, जागतिक अशांतता याचा परिणाम सोन्या-चांदीवरही होत असून बाजारात दोन्ही धातूंमध्ये सातत्याने चढउतार होत आहेत. दुपार होताच सोन्याचे भाव चांगलेच कडाडले असून सर्सामान्य लोकांनी खरेदी करण्याआधी दर नक्की जाणून घ्या.

मध्यपूर्वेत गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं युद्ध, यामुळे जगावर झालेला परिणाम, अशांतता आणि जागतिक तणाव या सगळ्याचा परिणा बाजारावर झाला नाही तर नवलंच. या युद्धाचा दैनंदन जीवनातल्या गोष्टींवर तर असर होतकोच, पण सोनं-चांदी हे मौल्यवान धातूही यामुळे प्रभावित होताना दिसत आहेत. सध्या काही दिवस इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतल्यामुळे परिस्थिती थोडी निवळली असून बाजारातही त्याचे पदसाद उमटताना दिसत आहेत. सोनं आणि चांदीच्या भावात आज पुन्हा बदल झाले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, मात्र चांदीचे दर हे चांगलेच खाली घसरले आहेत. आज 27 मार्च रोजी दुपारी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी मात्र 2 हजार रुपयांनी खाली घसरली आहे.

800 रुपयांनी दर वाढल्याने सोन्याचे दर आज जीएसटी सह 1 लाख 48 हजार 114 रुपये प्रति तोळा या किमतीपर्यंत पोहोचले आहेत. तर चांदीची किंमत घसरली असून जीएसटीसह 1 किलो चांदीची किंमत ही 2 लाख 39 हजार 990 रुपये इतकी झाली आहे.

दरम्यान देशभरातील प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत सध्या अभूतपूर्व मंदी बघायला मिळत आहे. तिथे चांदीचे भाव आज 2 लाख 20 हजार रुपये प्रतिकिलो इतके खाली आहेत, मात्र असं असलं तरीही गुंतवणूकदार व ग्राहकांनी सुद्धा पाठ फिरवल्याचं चित्र बाजारात बघायला मिळत आहे.

एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांची नवीन ऑर्डर घेण्यास चांदी व्यावसायिक टाळाटाळ करत आहेत. शिवाय गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भासल्याने खामगाव शहरातील जवळपास 20 ते 22 चांदीची दागिने आणि भांडी बनवणारे मोठे कारखाने ठप्प पडले आहेत आणि त्यामुळे चांदीची भांडी व दागिने याचे उत्पादन चार दिवसापासून बंद आहे. शिवाय कारखाने बंद पडल्याने शेकडो कारागिरांचा रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चांदीची भांडी व दागिने बनविण्याचं संपूर्ण काम हे बंद पडल्याने चांदीच्या बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प पडले असल्याचे चित्र आहे.