Gold Rate : लगेच सोन्यात गुंतवणूक करावी का? तोटा होणार की फायदा; जाणून घ्या भविष्यात काय होणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळेच आता भविष्यातही अशीच भाववाढ होणार का? सोन्यात गुंतवणूक करणे योग्य राहील का? असे विचारले जात आहे.

| Updated on: Jan 22, 2026 | 8:35 PM
1 / 5
गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचा भाव सातत्याने वाढतो आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सामान्यांना मात्र सोन्याचा दागिना करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. असे असतानाच आता भविष्यात सोन्याची दिशा काय असेल? सोने आणि चांदीचा भाव अशाच पद्धतीने वाढत जाणार का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात सोन्याची चाल काय असेल? ते जाणून घेऊ या... (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
सध्या जागतिक पातळीवर अनिश्चिततेची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण आणि वेगवेगळ्या देशांत चालू असलेला संघर्ष आणि युद्ध यामुळे बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळेच लोकांचा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. सध्या चांदी ही सोन्यापेक्षाही महाग होत आहे. चांदीचा भाववाढीचा दर हा सोन्यापेक्षा जास्त आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात चांदीचा दर हा 3.5 लाख रुपये ते 4 लाख रुपये प्रति किलोपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा  भावदेखील अशाच पद्धतीने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
सध्याची स्थिती लक्षात घेता या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असल्याचे सांगितले जात असले तरीही भविष्यात व्याजदरात कपात झाल्यास किंवा जागतिक पातळीवर स्थिरता आल्यास सोने, चांदीचा भाव स्थिर राहू शकतो. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये एकगठ्ठा गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी-थोड रक्कम मौल्यवान धातूमध्ये गुंतवावी असे सांगितले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)