
सोने आणि चांदीच्या भावात रोज बदल होत आहे. कधी सोन्याचा भाव वाढताना दिसतोय तर कधी हाच भाव क्षणात घसरलेला पाहायला मिळत आहे. आज (10 डिसेंबर) सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी कमालच केली आहे. चांदीचा भाव तर अचानक चांगलाच वाढला आहे.

सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढला आहे. चांदीचा भाव तर एका दिवसात तब्बल 8000 रुपयांनी वाढला आहे. सोन्याचा भावही 800 रुपयांनी वाढला आहे. या भाववाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 8 हजार रूपयांची वाढ झाली असून चांदीचा दर प्रत्येक एक किलोमागे जीएसटीसह 1 लाख 92 हजार 610 रुपयांवर पोहोचला आहे.

दिवाळीनंतर दोन महिन्यांनी चांदीच्या दराने 1 लाख 90 हजारांचा आकडा ओलांडला आहे. दुसरीकडे चांदीसोबत सोन्याच्या दरात देखील 800 रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम मागे जीएसटी सह 1 लाख 31 हजार 840 रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात रोजच चढ-उतार होत असल्याने भाविष्यात या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव किती वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऐन लग्नसराईत ही भाववाढ होत असल्याने मात्र सामन्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.