Gold Rate : सोनं धाडकन कोसळलं, भाव तब्बल 4300 रुपयांनी घसरला; 10 ग्रॅम फक्त… दागिने करण्याची हीच योग्य वेळ?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. आता सर्वसामान्यांसाठी खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.

| Updated on: Feb 08, 2026 | 6:09 PM
1 / 5
जळगावात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसात मोठी घसरण झाली आहे. 8 दिवसात सोने 4 हजार 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर आठ दिवसात तब्बल 43 हजार रुपयांनी घसरला आहे.

जळगावात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसात मोठी घसरण झाली आहे. 8 दिवसात सोने 4 हजार 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर आठ दिवसात तब्बल 43 हजार रुपयांनी घसरला आहे.

2 / 5

सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहेत. तर चांदीचा दर 2 लाख 60 हजार रूपयांपर्यंत खाली आला आहे. सोन्याचा दर 31 जानेवारी रोजी विना जीएसटी 1 लाख 58 हजार 800 रुपये होता. आता हाच दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5

31 जानेवारी चांदीचा दर विना जीएसटीसह 3 लाख 3 हजार रुपये एवढे होता. आता चांदी 2 लाख 60 हजार रूपयांपर्यंत खाली आली आहे. गगनाला भिडलेले दर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

4 / 5

सध्या जरी सोने आणि चांदीचा दर कमी झालेला असला तरी पुढच्या काळात मात्र दोन्ही मौल्यवान धातूंची वाढण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us