
शाहिद पठाण टीव्ही ९ मराठी गोंदिया : एका 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी गोंदियाच्या रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारती शहारे (40) रा. दासगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक महिला भारती शहारे यांच्या पतीचा एक वर्षापूर्वी आजारामुळे मृत्यू झाला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यानंतर आपल्या मुलांसोबत त्या दासगाव येथे राहत होत्या. दरम्यान 27 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मृत्यूनंतर 27 जून रोजीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, 29 जून रोजी पोलिसांनी संशयाच्या आधारावर खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

आता मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. घटनेचा तपास रावणवाडी पोलीस करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)