
सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.