Health Insurance : या 5 कारणांमुळे रिजेक्ट होतो तुमचा मेडिक्लेम, जाणून घ्या
आरोग्य विमा सध्याच्या परिस्थितीत खूप आवश्यक बनला आहे. आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा खूपच महत्त्वाचा असतो. पण अनेकदा काही कारणांमुळे तुमचा क्लेम नाकारला जातो. विमा क्लेम करताना आपण काही चुका करतो ज्यामुळे तो रिजेक्ट होण्याची शक्यता असते. कोणती आहेत ती कारणे जाणून घ्या.
हेल्थ इन्शुरन्स हे आपत्कालीन परिस्थितीत खूप महत्त्वाचे ठरते. कारण उपचार खर्चाच्या ओझ्यापासून ते वाचवते. परंतु अनेक वेळा आरोग्य विमा घेतल्यानंतरही कधीकधी क्लेम नाकारला जातो.
Follow us
हेल्थ इन्शुरन्स हे आपत्कालीन परिस्थितीत खूप महत्त्वाचे ठरते. कारण उपचार खर्चाच्या ओझ्यापासून ते वाचवते. परंतु अनेक वेळा आरोग्य विमा घेतल्यानंतरही कधीकधी क्लेम नाकारला जातो.
लोक मोठ्या संकटात सापडल्यानंतर त्यांना आरोग्य विमा संरक्षण देतो. पण कधीकधी तो नाकारला जाण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पॉलिसी घेताना कोणत्या चुका टाळाच्या ते जाणून घ्या.
अनेक वेळा लोकं पॉलिसी खरेदी करताना वय, उत्पन्न किंवा इतर वैद्यकीय धोरणांबद्दल चुकीची माहिती देतात. त्यामुळे कंपन्या त्यांचे आरोग्य विम्याचा क्लेम नाकारु शकतात.
आरोग्य विम्याचा क्लेम नाकारण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांची माहिती न देणे. अनेकजण त्यांना असलेल्या आजारांची माहिती देत नाहीत. त्यामुळे आरोग्य विमा कंपन्या या आधारावर त्यांचा क्लेम नाकारतात.
प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीला वेटिंग पीरेड असतो. अशा परिस्थितीत, या कालावधीत तुम्ही विमा दावा केल्यास, तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. जर तुम्ही वेळेवर प्रीमियम भरत नसाल तरी देखील तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीच्या क्लेमसाठी कालमर्यादा असते. त्यामुळे क्लेम केल्यास कंपनी दावा नाकारू शकते.