
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने बिग बॉस या शोचंही विजेतेपद पटकावलं.

हिना खान ही टीव्ही इंडस्ट्रीतील उच्च शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

हिनाने 2009 मध्ये गुरुग्रामधील 'सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंट' इथून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलंय.

नंतर तिने दिल्ली कॉलेजमध्ये शिकताना मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यातील अक्षराच्या मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली होती.

मालिकेसाठी निवड झाल्यानंतर हिना कुटुंबीयांना न सांगताच मुंबईला आली होती. हिनाने टीव्ही इंडस्ट्रीत स्वत:च्या बळावर नाव कमावलं.