Toxic : याआधी जितका पैसा मिळालेला नाही, तितका पैसा..’टॉक्सिक’साठी कियारा आडवाणीने घेतलं मजबूत मानधन, इंटिमेट सीनमुळे होतेय ट्रोल
Toxic : यशच्या 'टॉक्सिक'सिनेमाचं नुकतचं 'तबाही' गाणं रिलीज झालं. त्या गाण्यामध्ये यश आणि कियारा आडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. त्या गाण्यावरुन यश आणि मेकर्सचं बरच ट्रोलिंग करण्यात आलं.

यशचा 'टॉक्सिक' सिनेमा अनेकदा पोस्टपोन झाल्यानंतर अखेर आता रिलीज होणार आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होईल. या चित्रपटाचं 'तबाही' गाणं रिलीज झालं. यात यश आणि कियारा आडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. त्यावरुन प्रचंड ट्रोलिंग सुरु आहे.

यशच्या चित्रपटात पाच अभिनेत्री काम करतायत. यात कियारा आडवणीशिवाय नयनतारा, रुक्मिणी वसंत, हुमा कुरैशी आणि तारा सुतारिया यांचा समावेश आहे. कियारा चित्रपटात यशच्या लव इंटरेस्टचा रोल प्ले करत आहे. तिचं नाव नादिया आहे.

कियारा आडवाणी शिवाय यश आणि मेकर्स इंटीमेट सीन्ससाठी खूप ट्रोल होतायत. कसा चित्रपट बनवलाय, ज्यात महिलांना असं दाखवलं जातय अशी डायेरक्टर गीतू मोहनदासवर टीका होतेय. कियारा आडवाणीसाठी हा मोठा चित्रपट आहे.

कियारा आडवाणीने सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' फिल्मसाठी जवळपास 15 कोटी रुपये फि घेतली आहे. याआधी कुठल्याही प्रोजेक्टसाठी तिला इतका पैसा मिळालेला नाही. यश चित्रपटात प्रॉफिट शेयरिंग मॉडलवर डील करत आहे. कारण तो सह-निर्माता आहे. चर्चा अशी सुद्धा आहे की, त्याने 50 कोटी रुपये घेतलेत.

वर्ष 2026 यशसाठी खूप मोठं ठरु शकतं. त्याचा'टॉक्सिक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला तर दिवाळीला त्याचा 'रामायण' चित्रपट येणार आहे. त्यात तो रावणाच्या भूमिकेत आहे. KGF 2 नंतर त्याचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही.