
नोकरदार वर्ग आज वैयक्तिक, वाहन अथवा घरासाठी कर्ज घेतात. कर्ज घेणे हा आयुष्याचा भाग झाला आहे. अनेक जण लग्नानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज घेतात. प्रत्येकाला स्वतःचे घर असावे, वाहन असावे असे वाटते. त्यासाठी कर्ज पर्याय अनेकजण निवडतात.

पण कर्ज घेणे नोकरदार वर्गासाठी इतके सोपे नाही. त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. बँकेला तुमच्या कमाईचा स्त्रोत सांगावा लागतो. कमाईच्या खात्रीसाठी बँका अगोदर कागदपत्रं मागतात.

कर्ज मंजुरीसाठी बँका सर्वात अगोदर सॅलरी स्लिप मागतात. त्याशिवाय कर्जाचा अर्ज पुढे सरकत नाही. जर कंपनीने सॅलरी स्लीप दिली नाही. वेतन विवरण पत्रक दिले नाही तर मग अशावेळी बँका कर्ज प्रकरण नामंजूर करू शकतात.

जर कंपनीने सॅलरी स्लिप दिली नाही तर मग तुम्हाला कर्ज मिळणार तरी कसं? पण अनेक मोठ्या बँका सॅलरी स्लिप नसली तरी कर्ज देतात. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या कमाईचा स्त्रोत आणि त्याचा पुरावा सादर करावा लागते.

सॅलरी स्लिप नसेल तर अर्जदाराला 6 महिन्यांचे बँकेचे विवरण पत्र द्यावे लागेल. ज्या बँकेत सॅलरी, वेतन जमा होते. त्याचे हे खाते विवरण असायला हवे. काही प्रकरणात बँका 12 महिन्यांचे स्टेटमेंट सुद्धा मागू शकते. जर तुमच्यावर दुसरे एखादे कर्ज असेल तर त्याचे विवरण सादर करावे लागेल.

यासोबतच गेल्या 2 वर्षांत फॉर्म 16 वा आयटीआरची (Income Tax Return) कॉपी सादर करावी लागेल. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज वाढून मिळण्याची शक्यता आहे. बँक केवळ सॅलरी स्लिपच नाही तर इतरही अनेक कागदपत्रे तपासते. त्याची अर्जदाराला पुर्तता करावी लागते.