
एरंडेल तेल,मेथी पावडर आणि एलोव्हेरा : केस गळती, केसांना दोन मुळे आले असतील बचावासाठी एक कप ऐलोवेरा जेल,२ चमचे एरंडेलचे तेल आणि २ चमचे मेथी पावडर मिक्स करुन २ तास केसांना लावून ठेवावे नंतर केस धुवावे.

मध, नारळ तेल आणि एलोव्हेरा : कोंडा आणि निर्जीव केसांसाठी ५ चमचे एलोव्हेरा जेल,३ चमचे नारळाचे तेल,२ चमचे मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. अर्धात तास केसांना लावून नंतर धुवा आणि रिझल्ट पाहा.

लेमन आणि एलोव्हेरा - केस गळती कमी करण्यासाठी २ चमचे एलोव्हेरा जेलमध्ये १ चमचे लिंबूचा रस मिक्स करुन केसांना लावा. लिंबूतील विटामिन सी केसांची गळती रोखतो.

कांद्याचा रस आणि एलोव्हेरा : १ कप कांद्याचा रस आणि एक चमचा एलोव्हेरा जेल मिक्स करा,याला एक केसांना लावा, केस गळती कमी होऊन नवीन केस देखील उगवतील

जास्वंद आणि एलोव्हेरा : केसांच्या मजबूती आणि पोषणासाठी २ चमचे जास्वंदीची पेस्ट आणि १ कप ऐलोव्हेरा जेल मिक्स करुन स्कॅल्प आणि केसांना लावा. ३० ते ६० मिनिटांनंतर हलका शॅम्पू आणि कंडीशनरने केस धुवा

लेमन ज्यूस, व्हिटामिन्स-ई आणि एलोव्हेरा : केस गळती रोखण्यासाठी १ चमचा एलोव्हेरा जेल, १ चमचा लिंबूचा रस आणि १ चमचा व्हिटामिन ई ऑईल मिक्स करुन लावावे.हा पॅक केसांना मजबूत आणि हेल्दी बनवतो.

ग्रीन टी आणि एलोव्हेरा : केसांची ग्रोथ आणि हेल्दी लूकसाठी १ कप ग्रीन टी आणि १ कप एलोव्हेरा जेल मिक्स करुन केसांना लावावे, हा पॅक हेअर ग्रोथ वाढवतो.केसांना पोषण देण्यास मदत करतो.