
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर आठ विकेटने विजय मिळवला होता. तर पाकिस्तान संघाचा यजमान युएसएने सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात बाबर अँड कंपनीला विजय मिळवावाच लागणार आहे.

पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघाकडे असे दोन खेळाडू आहेत जे यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू शकतात.

हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव आहे. कुलदीप यादव याने बाबर आझमला आपल्या स्पिनवर बोल्ड केलं होतं. त्यामुळे बाबर सावध खेळताना दिसेल.

अर्शदीप सिंह याने बाबर आझम आणि रिझवान यांना माघारी पाठवलं होतं. त्यामुळे रिझवान आणि बाबर यांच्यासाठी धोक्याची असणार आहे. ज्या ठिकाणी सामना होणार आहे त्या पिचवर बॉलर्सला जास्त मदत मिळत आहे.