भाजप-निवडणूक आयोगाकडून लोकशाही हायजॅक, खासदारांना धमकावतात; पोलिसांनी थांबून ठेवल्यानंतर राहुल गांधी म्हणाले….
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं की, ज्ञानेश भाई आता बस्स झालं, राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आता वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे.
1 / 5

दिल्लीमध्ये आज दिवसभर वातावरण तापलेलं पाहायल मिळत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठरवल्या प्रमाणे मोर्चा काढला आहे.
2 / 5
यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी राहुल गांधी आणि सर्व विरोधकांची मोठी ताकद पाहायला मिळाली आहे.
3 / 5
राहुल गांधींनी यावेळी सांगितलं की, ३०० खासदार निवडणूक आयुक्तांना भेटू इच्छितात. पण पोलिस आम्हाला अडवत आहेत. पोलिस आम्हाला धमकावत आहेत, याचं कारण काय?
4 / 5
निवडणूक आयुक्तांनी आम्हाला भेटलं पाहिजे, भाजपाने लोकशाहीला हायजॅक केलंय, आम्हाला आकाशवाणी भवनात थांबून ठेवलंय. असं यावेळी राहुल गांधींनी म्हटलं आहे.
5 / 5
लगालो जीतना जोर लगाना है, ज्ञानेश का इस्तिफा लेकर रहेंगे अशा घोषणा यावेळी पाहायला मिळाल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य: काँग्रेस ट्विटर हँन्डल)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us