
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. एका प्रकारे या दोन्ही देशांत अप्रत्यक्षपणे युद्धच चालू झाले आहे. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही भारतातील सीमाभागातील राज्यांत भ्याड हल्ले केले आहेत. राजस्थान, पंजाब, जम्मू या प्रदेशातील काही गावांत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानने डागलेली एक मिसाईल सापडली आहे. ही मिसाईल अद्याप फुटलेली नाही.

जैसलमेरच्या पोखरण आणि बाडनेर या भागात पाकिस्तानने शुक्रवारच्या रात्री हे हल्ले केले आहेत. जैसलमेरमधील भागू येथे तर जिवंत मासाईल सापलडी आहे.

पंजाबच्या गुरुदास येथे पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी स्फोटाचा मोठा आवाज झाला होता. गावातील एका रिकाम्या शेतात स्फोटामुळे मोठा खड्डा पडला आहे. या भागात पंजाब पोलीस आले आहेत.

पंजाबच्या अमृतसरमधील वडाला येथे ड्रोन पाडले आहेत. या ड्रोन हल्ल्यामुळे घरांच्या परिसरात आग लागली होती. ड्रोन पाडल्यामुळे ही आग लागली होती. ड्रोनचे साहित्य येथे जमा करण्यात आले आहेत. या ड्रोनमधील बॉम्ब आर्मीच्या जवानांनी डिफ्यूज केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.