भारत आणि इराणमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो?

India Iran Trade : इराण आणि इस्रायलमध्ये खतरनाक युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणी लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. याचा व्यापारावरही परिणाम होणार आहे. आज आपण भारत आणि इराण यांच्यात कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो ते जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 28, 2026 | 11:09 PM
1 / 5
भारत आणि इराणमध्ये शतकानुशतके जुने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इराण त्याच्या अनेक आवश्यक गरजांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर अवलंबून आहे.

भारत आणि इराणमध्ये शतकानुशतके जुने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इराण त्याच्या अनेक आवश्यक गरजांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर अवलंबून आहे.

2 / 5

भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इराण भारताला कच्चे तेल पुरवतो. भारत दरवर्षी इराणकडून लाखो लिटर तेल खरेदी करतो. मात्र युद्धामुळे या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

3 / 5

तसेच भारत इराणला औषधे, तांदूळ, गहू, साखर आणि कापूस यांची निर्यात करतो. तसेच इराण बासमती तांदळाचा प्रमुख खरेदीदार आहे.

4 / 5

याशिवाय, चहा, साखर, औषधे, ऑटो पार्ट्स आणि काही अभियांत्रिकी साहित्य देखील भारतातून इराणला निर्यात केले जाते. हा व्यापार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे.

5 / 5

भारत इराणमधून पिस्ता आणि खजूर, काही रसायने, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि काचेच्या वस्तू आयात करतो. 1947 च्या फाळणीपूर्वी भारत आणि इराण भौगोलिकदृष्ट्या जवळ होते. मात्र पाकिस्तानच्या निर्मितीमुळे थेट जमीनी संबंध तुटले, मात्र तरीही दोन्ही देशांमधील व्यापार नियमितपणे सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us