
आयपीएल 2024 च्या ट्रॉफीवर शाहरुख खानच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' या टीमने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात केकेआरने सनराइजर्स हैदराबादला 8 विकेट्सने हरवलं. यावेळी स्टेडियमवर शाहरुख खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन आणि अबराम हे सर्वजण स्टेडियमवर उपस्थित होते. त्याचसोबत सुहाना खानच्या खास मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूरसुद्धा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचल्या होत्या.

याआधी केकेआरच्या टीमने चेन्नईच्या याच मैदानावर आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. 2012 जेव्हा केकेआरने पहिल्यांदा हा विजय मिळवला, तेव्हाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखसोबत सुहाना, अनन्या आणि शनाया कपूर दिसत आहेत.

सुहाना, अनन्या आणि शनाया या तिघी लहानपणापासूनच एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. आयपीएलच्या अनेक सामन्यांदरम्यान या तिघींना एकत्र पाहिलं गेलंय.

अनन्या पांडे आणि सुहानासोबतचा शाहरुखचा हा फोटोसुद्धा जुना आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. त्यावेळी अनन्या आणि सुहाना कसे दिसायचे, यावरून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.