
आयपीएल 2024 मध्ये रविवारी झालेल्या गुजरात टायटन्स आणि सनराजर्स हैदराबादमधील सामन्यात गुजरातने सात विकेटने हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये गुजरात संघाच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या एकाही फलंदाजाला वर्चस्व गाजूव दिले नाही.

सनरायजर्स हैदराबाद संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 162-8 धावा केल्या. एकाही फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अभिषेक शर्मा आणि अब्दुल समन्स यांनी सर्वाधिक 29धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबाद संघाला रोखण्यामध्ये एका गोलंदाजाने दमदार कामगिरी केली. गुजरातच्या या बॉलरला हैदराबादचा एकही खेळाडू बाऊन्ड्री मारू शकला नाही.

गुजरात टायटन्स संघाने हा सामना सात विकेटने जिंकला. साई सुदर्शन याने ४५ धावा आणि डेव्हिड मिलरने नाबाद ४४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आता दोन विजयांसह गुजरात संघाचे चार गुण झाले आहेत.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहित शर्मा आहे. आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे त्याला एक सिक्स वगळता एकही बाऊन्ड्री बसली नाही.