अखेर भारताने निर्णय घेतलाच! इराण-इस्रायल युद्धामुळे सरकारचा सर्वात मोठा आदेश; इंधन तुटवडा होणारच नाही!

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

| Updated on: Mar 03, 2026 | 7:56 PM
1 / 5
सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. विशेष म्हणजे या युद्धात आखाती देशही भरडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

2 / 5

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

3 / 5

याच कारणामुळे भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे गृहित धरून भारताने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने रिफायनरी कंपन्यांसोबत रणनीती तयार केली आहे.

4 / 5

रिफायनरी कंपन्यांनी इंधनाची निर्यात कमी करावी. तसेच निर्माण केलेले इंधन देशांत कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजन आखावे, असे सरकारने रिफायनरी कंपन्यांना सांगितले आहे. यासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅसच्या उत्पादनातही वाढ करावी, असे सरकारने सुचवले आहे.

5 / 5

यासह होर्मुझच्या खाडीद्वारे होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या पारवठ्यासाठी नवी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली आहे. सध्यातरी इंधनाची किंमत वाढणार नाही, परंतु भविष्यात युद्ध चालूच राहिले तर सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्या काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us