
टूथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज...? दातांची स्वच्छता राखणाऱ्या टूथपेस्टला सामान्यपणे व्हेजिटेरियन मानलं जातं. पण काही ब्रँड असे आहेत की त्यात जनावरांकडून मिळणाऱ्या काही गोष्टींचा वापर केला जातो. या गोष्टींचा वापर का केला जातो? असा प्रश्न निर्माण होतो. टूथपेस्ट नॉनव्हेजेटेरियन झाला हे कसं ओळखायचं? (फोटो: Pixabay)

टूथपेस्ट कधी बनते नॉनव्हेज ? - सामान्यपणे भारतात टूथपेस्ट बनवणाऱ्या यात रोपट्यांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करतात. पण अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड मात्र यात जनावरांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करतात. म्हणजे जनावरांच्या चरबीपासून मिळणारे ग्लिसरीन, त्यांच्या हाडांतून निघणारा कॅल्शियम फॉस्फेट आदी.

कंपन्या असं का करतात? - असं करण्याची असंख्य कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे स्वस्त आणि टिकाऊ पर्याय. जनावरांकडून आलेल्या गोष्टी म्हणजे, बोन चारकोल स्वस्त आणि सहज मिळतो. या गोष्टी टूथपेस्टला चांगलं टेक्सचर आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम करतात. त्यामुळे कंपन्या त्याचा सर्रास वापर करतात. आणि त्याची माहिती टूथपेस्टच्या पाकिटावरही दिलेली असते.

कळणार कसं? - तुमच्याजवळ जो टूथपेस्ट आहे तो व्हेज आहे की नॉनव्हेज याची माहिती लगेच कळते. टूथपेस्टच्या पॅकेटवर त्याच्याशी संबंधित सर्व माहिती दिली जाते. टूथपेस्टमध्ये जनावरांशी संबंधित गोष्टींचा वापर केला नसेल तर त्यावर 100 टक्के व्हेजेटिरयन असं लिहिलं जातं. ते तुम्ही चेक करू शकता आणि शाकाहारी लोक त्याचा वापर करू शकतात.

toothpaste