PHOTO | Jaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू?

बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

| Updated on: Oct 28, 2020 | 1:30 PM
1 / 7
बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तो सध्या कलर्स वाहिनीवर (Colors TV) सुरू असलेले ‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वात कंटेस्टंट म्हणून सहभागी झाला आहे.

2 / 7
मात्र, यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. 	घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने (Jaan Sanu) ‘मला मराठीची चीड येते’, असे म्हणत ‘मराठी’ भाषेचा अपमान केला आहे.

3 / 7
जान कुमारच्या या वक्तव्यानंतर त्याला स्पर्धेतून वगळण्यात यावं अशी मागणी शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

4 / 7
तर, मनसेनेही यावरुन जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो’, असा इशाराही त्यांनी दिला.

5 / 7
जान कुमारचं खरं नाव डयेश भट्टाचार्य आहे. त्याचा जन्म 15 एप्रिल 1994 ला झाला. तो वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं गातो.

6 / 7
1994 मध्ये वडील कुमार सानू आणि आई रीटा यांचा घटस्फोट झाला. जानच्या जन्मापूर्वीच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा रीटा या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या.

7 / 7
कुमार सानू आणि रीटा भट्टाचार्य यांना तीन मुलं आहेत. जान, जेसी आणि जिकको.  जान एक गायक आहे, जेसी शिक्षक आहे तर जिकको ग्राफिक डिझायनर आहे.