
'गदर 2'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सनी देओलचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतोय. 200 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी सनी देओलने 42 वर्षांमध्ये सर्वाधिक फी आकारली आहे. सनी देओलने या चित्रपटातील भूमिकेसाठी 50 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. 'गदर 2'नंतर सनी देओलचं नशीब फळफळलं आहे. याचाच फायदा घेत त्याने 'जाट'साठी तगडं मानधन घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता रणदीप हुड्डाने फक्त 7 कोटी रुपये फी घेतली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जगपती बाबू यांनी या चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रम्या कृष्णनचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यासाठी तिला 70 लाख रुपये मिळाल्याचं समजतंय.

अभिनेत्री सैयामी खेरला 'जाट'मधील भूमिकेसाठी एक कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे.

'छावा'मध्ये विकी कौशलसोबत भूमिका साकारलेला अभिनेता विनीत कुमार सिंहसुद्धा 'जाट'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याला एक ते दोन कोटी रुपयांदरम्यान मानधन मिळाल्याचं समजतंय.