जपानचा कर्णधारही बॉस बेबी सूर्यवंशीचा फॅन; पण सोबत खेळायला न मिळाल्याने नाराज, सामन्यानंतर मन मोकळं केलं
Japan Captain On Vaibhav Sooryavanshi : वैभवला सामन्यामध्ये स्थान न दिल्यानंतर जपानचा कर्णधार निराश झाला. त्याने त्याच्या मनातील भावना सांगितल्या आहे. तो नेमका काय म्हणाला आहे?

भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक टी-20 सामन्यात भारताचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला प्लेइंग-11 मध्ये स्थान न दिल्याने जपानचा कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग याने मोठे आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारत-जपान यांच्यातील ऐतिहासिक टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालं नाही. विशेष म्हणजे त्याला संघात न घेतल्याने जपानचा कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग यानेही आश्चर्य व्यक्त केलं. सामन्यानंतर बोलताना त्याने 15 वर्षांच्या वैभवला खेळताना पाहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
केंडेलने म्हटलं की, “15 वर्षांचा अत्यंत प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी आजच्या सामन्यात खेळत नसल्याचं पाहून मला थोडी निराशा झाली.” सामन्यापूर्वीही जपानच्या कर्णधाराने वैभवचं कौतुक केलं होतं. त्यामुळे या सामन्यात त्याला खेळताना पाहण्याची त्याची इच्छा होती. मात्र, वैभवला पुन्हा बाकावरच बसावं लागलं.
अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतही वैभवला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे जपानविरुद्ध केवळ 5 षटकांचा सामना असल्याने त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सलग चौथ्या सामन्यात तो प्लेइंग-11 बाहेर राहिला.
दरम्यान, पावसामुळे भारत-जपान सामना 5-5 षटकांचा करण्यात आला. भारताने 32 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना जपानने चांगली झुंज दिली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना 30 धावांवर रोखलं. अक्षर पटेलच्या अचूक गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला.