
परिधी हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं पण ‘जोधा अकबर’ या मालिकेमुळे परिधी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. परिधी शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘तेरे मेरे सपने’मधून केली होती.

परिधी हिला जोधा या भूमिकेने प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली... जोधा अकबर मालिकेत अभिनेता रजत टोकससोबत काम करून अभिनेत्रीला नवीन ओळख मिळाली. कारण रजत याने पूर्वी देखील अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.

परिधी आता कोणत्या मालिकेमुळे नाहीतर, तिच्या हटके ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर परिधी कायम सक्रिय असते. अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, परिधी हिला 2013 मध्ये टीव्ही विश्वात मोठा ब्रेक मिळाला. 18 जून 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेमुळे परिधी स्टार झाली. आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

परिधी नुकताच 'हक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सोशल मीडियावर देखील परिधी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर परिधी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.