
कॅनडामधील या रेस्टॉरंटमध्ये परदेशी लोकही येत आहेत आणि अनेक भारतीयही याचा आनंद घेत आहेत. प्रचंड आलिशान असं हे कॅफे आहे. संपूर्ण कॅफे गुलाबी फुलांच्या थीमसह डिझाइन केलेले आहे.

हे कॅफे बाहेरून एक शाही लूक देते. त्याची अंतर्गत रचना आणि बसण्याची व्यवस्था अद्भुत आहे. इतकेच नाही तर रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे आणि संपूर्ण रेस्टॉरंट चमकदार दिसते.

कॅनडामध्ये कॅफे सुरू होऊन 7 दिवस झाले आहेत. त्यानंतर या कॅफेमध्येही गोळीबार झाला. या गोळीबाराची जबाबदारी खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे.

बब्बर खालसा दहशतवादी हरजीत सिंग लाड्डीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लाड्डी हा NIA च्या यादीतील मोस्टवँटेड दहशतवादी आहे. हरजीत हा मूळचा पंजाबमधील नवांशहरमधील गरपधाना गावचा रहिवासी आहे.

कपिल शर्मा आता भारताबाहेरही स्टार मानला जातो. कपिल शर्माचे भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये चाहते आहेत. कपिल शर्माला या देशांमध्ये शोसाठी देखील आमंत्रित केले जाते. कपिल शर्माने कॅनडामध्ये अनेक शो केले आहेत.