
अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच बॉलिवूडची फॅशन क्वीन मानली जाते. रेड कार्पेट असो किंवा व्हेकेशन लूक... बेबोची स्टाईल नेहमीच चर्चेत असते. यावेळी करीना तिच्या कुटुंबासह ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहे आणि तिथून तिचे स्टनिंग लूक समोर येत आहेत. पण यावेळी करीनाने तिच्या फॅशना एक देसी ट्विस्ट देतानाच सगळयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photos : Kareen Kapoor Instagram)

करीनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल झाले आहेत. पण या फोटोंमध्ये तिने जे घातलंय त्यानेच लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

सध्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या करीनाने पिवळ्या रंगाचा हॉल्टर नेक स्विम टॉप घातला होता, ज्यावर बॅक टाय डिटेलिंग आहे. आणि त्यासोबत तिने जो स्कर्ट कॅरी केला, प्रत्यक्षत ती एक लुंगी आहे.

करीनाचा हा स्कर्ट कम लुंगी, बॉटल ग्रीन रंगाची आहे, ज्यावर पांढरे आणि लाल पट्टे आहेत. हा चेक पॅटर्न स्कर्ट अँकल लेंग्थ असून त्यामुळे करीनाला एक आरामदायक पण तितकाच क्लासी बीच लूक मिळाला.

काळ्या रंगाची टोपी आणि काळ्या सनग्लासेसने करीनाने हा लूक पूर्ण केला होता. मेकअपशिवाय आणि उघड्या केसांसह ती पूर्णपणे ताजी आणि नैसर्गिक दिसत होती. फोटो

हे फोटो शेअर करतानाच तिने खास कॅप्शनही लिहीली - ग्रीसमध्ये लुंगी डान्स केला... खूप मजा आली ! त्यासह तिने रेड हार्ट इमोजी टाकत पुढे लिहीलं नक्की ट्राय करा...

करीनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडलेत. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'बॉलिवूडची बेबोच फक्त हे करू शकते,अशी कमेंट एकाने केली. तर 'फक्त आमची क्वीन हीच मेडिटेरेनियनमध्ये देसी स्वॅग आणू शकते ' असं दुसऱ्याने लिहीलं.

करीनाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले असून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना तिचा हा देसी ट्विस्ट खूप आवडलाय.