चिकन वेस्टपासून तयार होणार बायोडिझेल
Chiken Waste Fuel | कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे त्यापासून सामान्य तापमाला तेल काढणे सोपे असते. आता जॉन अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील छात्र डुकराच्या विष्ठेपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत.

- केरळमधील पशुवैद्यक जॉन अब्राहम यांनी कोंबड्यांच्या विष्ठेपासून बायोडिझेल तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यासाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे.
- या पद्धतीने तयार झालेल्या एक लीटर इंधनावर कोणतीही गाडी 38 किलोमीटर प्रवास करु शकते. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत या बायोडिझेलची किंमत कमीही असेल आणि त्यामुळे प्रदूषणही कमी होईल.
- केरळ पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठातंर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयात जॉन अब्राहम प्राध्यापक आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते. त्यांच्या या प्रयोगाला अखेर यश आले असून त्यांना या शोधासाठीचे पेटंटही देण्यात आले आहे.
- जॉन अब्राहम यांनी वायनाड परिसरातील कलपेट्टा येथील महाविद्यालयात 18 लाख रुपये खर्च करुन एक संयंत्र विकसित केले. अब्राहम यांनी तयार केलेल्या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आले होते. तेव्हापासून अब्राहम यांच्या महाविद्यालयातील वाहने याच इंधनावर चालतात.
- कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे त्यापासून सामान्य तापमाला तेल काढणे सोपे असते. आता जॉन अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील छात्र डुकराच्या विष्ठेपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. 100 किलो चिकन वेस्टपासून एक लीटर बायोडिझेलची निर्मिती होते.
- गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते. त्यांच्या या प्रयोगाला अखेर यश आले.






