
नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल.

भोशी येथील शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. यावर्षी आंब्याच्या झाडाला चांगली फलधारणा झाली आहे.

मुंबईच्या व्यापार्यांनी कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला आहे. हा आंबा मुंबईवरून अमेरिकेच्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे.

700 झाडातून 30 लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकर्याला अपेक्षित आहे. तर इतर देशात या आंब्याला अधिक मागणी असल्याचे व्यापारी सांगतात.

त्यामुळे या जागेवर 225 रुपये किलोने आंबा खरेदी केला आहे. शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांना यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे.