
बॉलीवूडमधील स्टार किड्स खुशी कपूर अखेर झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून चित्रपटात सुष्टीत पदार्पण करणार आहे. खुशी बेटी कूपरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारणार आहे.

खुशी कपूरने अलीकडेच हिरव्या आणि काळ्या रंगाच्याशॉर्ट बॉडीकॉन चेकर्ड रिब्ड-निट ड्रेसमधील स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

खुशी कपूरचा हा नवा अवतार चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या पोस्टवर झालेल्या एकापेक्षा एक कमेंट्स याचा जिवंत पुरावा आहे. सुहाना खानने खुशीच्या पोस्टवर कमेंट करून "क्युटी " लिहिले, तर महीप कपूरने हार्ट इमोजी शेअर केली आहे.

यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर खुशी कपूर पांढऱ्या रंगाच्या टॉप , निळ्या डेनिम जीन्स व काळ्या रंगाच्या बॅगमध्ये कॅरी केलेली दिसून आली आहे.

या फोटोमध्ये सुहाना खान आणि तिचे मित्र युवराज मेंडा आणि वेदांग रैना देखील दिसत आहेत. आय मिस यू अशी कमेंट शनाया कपूरने केली आहे