याला गाणं म्हणतात का? 44 वर्ष जु्न्या सुपरहीट गाण्यावर किशोर कुमार चिडले, लता मंगेशकरांनीही थेट नकारलं
44 वर्षांपूर्वी आलेल्या ‘नमक हलाल’ चित्रपटातील एका गाण्याने हिंदी सिनेमात मोठी छाप पाडली. हे गाणे फक्त लोकप्रिय असून, अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमधील एक आहे. मात्र या गाण्यााच्या लांबीमुळे किशोर कुमार सुरुवातीला नाराज झाले होते. ते म्हणाले हे गाणं आहे की पुर्ण कहाणीच सांगितली आहे. पुढे याच गाण्याने त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमक हलाल’चे संगीत बप्पी लाहिड़ी यांनी दिले होते. ‘पग घुंघरू बांध’ हे गाणे 11 मिनिटे 40 सेकंदांचे होते आणि त्यात अमिताभ बच्चन यांचे संवादही होते. गाणे ऐकल्यानंतर किशोर कुमार यांनी “ये गाना है या कहानी?” असा सवाल केला होता.
बप्पी लाहिड़ी यांनी किशोर कुमार यांच्या आवाजासाठी या गाण्यात वेगळ्या संगीताचा प्रयोग केला होता. डिस्को बीट्स आणि सरगमचा वापर असलेल्या या गाण्याबाबत किशोर कुमारांना सुरुवातीला शंका होती. मात्र बप्पी दांनी त्यांना विश्वास दिला की हा प्रयोग त्यांच्या आवाजाला योग्य ठरेल. काही चर्चांनुसार लता मंगेशराकरांनी हे गाणं वादग्रस्त असल्यामुळे नाकारल्याचं सांगितलं जातं.
किशोर कुमार यांनी हे गाणे आपल्या खास शैलीत गायले आणि ते गाजले. 1983 च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये त्यांना ‘पग घुंघरू बांध’साठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. संगीत, किशोर कुमार यांचा आवाज आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयामुळे गाणे लोकप्रिय झाले.
‘नमक हलाल’मध्ये ‘रात बाकी बात बाकी’, ‘आज रपट जाएं तो’, ‘जवानी जानेमन’ आणि ‘थोड़ी सी जो पी ली है’ अशी अनेक लोकप्रिय गाणी होती. प्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशि कपूर, स्मिता पाटिल, परवीन बाबी आणि वहीदा रहमान होते. 1982 मधील यशस्वी चित्रपटांमध्ये ‘नमक हलाल’चा समावेश झाला.
‘पग घुंघरू बांध’मधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने गाण्याला आणखी रंगत आली. चित्रपटातील त्यांचा “I can talk English, I can walk English…” हा संवादही आजपर्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे हे गाणे आणि चित्रपट हिंदी सिनेमाच्या आठवणीत कायम राहिले आहेत.