
बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनसोबत चार्जर ठेवायला विसरतो आणि जर फोनचं चार्जिंग संपलं तर अशा परिस्थितीत फोन कसा चार्ज करायचा ही समस्या उद्भवू शकते. पण आता इतकी काळजी करण्याची गरज नाही. आज आपणएका अशा ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचा फोन कोणत्याही चार्जर किंवा पॉवर बँकशिवाय चार्ज होईल. यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनव्यतिरिक्त दुसऱ्या फोनची आवश्यकता असेल. यानंतर तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकाल.

जर तुम्ही दोन स्मार्टफोन वापरत असाल आणि त्यापैकी एक अँड्रॉइड असेल तर तुमचे काम झालेच म्हणून समजा. बाजारात येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा पर्याय मिळतो. जर तुमचा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर फोन सेटिंग्जमध्ये जा.

सेटिंग्जमध्ये आल्यानंतर, थोडं खाली स्क्रोल करा, नंतर तुम्हाला बॅटरी हा ऑप्शन दिसेल. बॅटरी ऑप्शनवर क्लिक करा. बॅटरीवर क्लिक केल्यानंतर, चार्जिंग सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला शेवटी रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन दिसेल.

रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा पर्याय सक्षम करा. यानंतर, तुमचे काम पूर्ण होईल.

यानंतर, तुम्हाला फक्त एक फोन टेबलावर उलटा ठेवावा लागेल. दुसरा फोन त्यावर ठेवावा लागेल. आता तुमचा फोन चार्ज होण्यास सुरुवात होईल. या प्रक्रियेला पॉवरशेअर फीचर असेही म्हणतात. नावाप्रमाणेच, ते एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर पॉवर पाठवू शकते.

इमर्जन्सी सिच्य़ुएशनमध्ये तुम्ही ही युक्ती वापरू शकता. पण नियमितपणे तुमचा फोन फक्त चार्जरने चार्ज करा. अन्यथा त्याचा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.