कोरियन मुली बाहुलीसारख्या सुंदर दिसतात, तरुण दिसतात, काय आहे रहस्य? वाचा
कोरियन सौंदर्य! हा विषय सध्या खूप चर्चेचा आहे. सध्या सगळ्यांना कोरियन सिरीजचं वेड लागलंय. या सिरीजमध्ये कोरियन अभिनेत्री असतात त्यांना बघून लोकांना प्रश्न पडतो या इतक्या सुंदर कशा दिसतात? कोरियन महिला चाळिशीत असल्या तरी देखील त्या २० वर्षाच्या वाटतात. तरुण दिसण्यासाठी या महिला काय करतात? काय टिप्स फॉलो कराव्यात बघुयात...

सगळ्यांना एकच प्रश्न नेहमी असतो. कोरियन महिला इतक्या सुंदर कशा? त्या तरुण, चमकदार कश्या? त्या चेहऱ्याला काय लावतात? जाणून घेऊयात टिप्स ज्या फॉलो केल्यावर तुम्ही सुद्धा कोरियन महिलांप्रमाणेच सुंदर दिसाल...

कोरियन महिला ४० वर्षांच्या असल्या तरी २० वर्षे वय असल्यासारख्या दिसतात. या महिला तरुण दिसण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करतात. तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा तरुण आणि सुंदर दिसाल.

कोरियन लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे चहा असतात. त्यात एक बार्ली चहा नावाचा प्रकार आहे. बार्ली चहा नुसता प्यायला जात नाही तर तो स्किन वर लावला सुद्धा जातो. हा चहा टोनर म्हणून वापरला जातो. याशिवाय केस धुताना सुद्धा हा चहा वापरला जातो. या चहाने केस धुतल्यावर केस जबरदस्त चमकतात आणि त्यांना पोषण मिळते. कोरियन महिला हा बार्ली चहा पिऊन सुंदर आणि तरुण दिसतात.

मध चेहऱ्याला लावल्यावर चेहरा चमकदार होतो, हे स्किनचं सिक्रेट कोरियन महिलांचं आहे. मध चेहऱ्याला लावताना हे मध सेंद्रिय आहे, भेसळयुक्त नाही याची खात्री करावी. दिवसातून दोनदा मध लावल्याने चेहरा चांगला होतो, मध लावून झालं की थंड पाण्याने चेहरा धुवा. मधात अँटीऑक्सिडंट्ससह सर्व चांगले गुणधर्म असतात जे त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात

साखर खायला गोड पण त्वचेला सर्वात वाईट. साखर खूप खाल्ली की त्वचा निस्तेज होते. होय! काही दिवस साखर खायची बंद करून बघा तुम्हाला नक्कीच काहीतरी फरक दिसेल. पांढरी साखर त्वचेला लवकर वृद्ध बनवते.