
अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट नुकतेच लग्नबंधनात अडकले. रविवारी क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीचे फोटो पोस्ट केले. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हळदीच्या कार्यक्रमात पुलकितने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. तर क्रिती भगव्या रंगाचा क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि दुपट्टा अशा स्टायलिश लूकमध्ये दिसून आली.

क्रिती आणि पुलकितच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला. हळदीचा रंग पिवळा नसून मातीच्या रंगाचा असल्याने अनेकांनी त्यावरून प्रश्न उपस्थित केला. हळद आहे की चिखल, असा सवाल काहींनी केला.

हळदीच्या जागी माती का लावत आहेत, असंही नेटकऱ्यांनी विचारलंय. तर हळदीच्या ऐवजी मेहंदी अंगाला लावली का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर क्रितीने फोटोंच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे.

'आमची हळद थोडी वेगळी होती. प्रथा म्हणून चिमूटभर हळद आणि त्यात मुलतानी माती मिसळण्यात आली होती. पुलकित आणि माझ्यासाठी ते खास बनवलं होतं. वर आणि वधूच्या त्वचेची काळजी घेत मुलतानी मातीपासून हळद पार पडली', असं तिने लिहिलंय.

दिल्लीच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये पुलकित आणि क्रितीचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. हे दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

पुलकितचं हे दुसरं लग्न असून त्याने पहिलं लग्न श्वेता रोहिराशी केलं होतं. तीसुद्धा एक अभिनेत्री असून सलमान खानशी तिचं खास नातं आहे. श्वेता ही सलमानची मानलेली बहीण आहे. ती दरवर्षी न चुकता सलमानला राखी बांधते.

पुलकित आणि श्वेताचं लग्न 2014 मध्ये धूमधडाक्यात पार पडलं होतं. मात्र लग्नाच्या वर्षभरातच या दोघांच्या नात्यात कटुता आली. एका मुलाखतीत श्वेताने याविषयीचा खुलासा केला होता.

पुलकित आणि क्रिती हे गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘पागलपंती’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.