
गणेशोत्सवाच्या निमित्तानं लाल, पिवळे कपडे परिधान करणं उत्तम ठरू शकतं. गणेश चतुर्थीला हे रंग परिधान करणे शुभ मानले जाते. या खास दिवशी तुम्ही कमी वजनाची बनारसी, रेशीम आणि ऑर्गन्झा साड्या परिधान करू शकता. जर साडी हलकी असेल तर तुम्ही पूजेचं काम सहज करू शकता. हलक्या वजनाचे दागिने सोबत ठेवा.

जर तुम्हाला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही चिकनकारी, अनारकली सूट कॅरी करू शकता. हे परिधान करण्यास अतिशय आरामदायक आहे. जर तुम्हाला हेवी लूक नको असेल तर तुम्ही प्रिंटेड कुर्ती घालू शकता. हे दिसायला अतिशय स्टायलिश दिसते.

सध्या शरारा सूट खूप ट्रेंडमध्ये आहे जो तुम्ही तुमच्या आवडत्या डिझाईन आणि रंगाचा परिधान करू शकता. हे सध्या ट्रेंडमध्ये आहे, ते आरामदायक आहेत.

गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी पुरुष प्रिंटेड कुर्ता घालू शकतात. याशिवाय जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुर्त्यासह कोट ट्राय करू शकता. जर तुम्हाला फेस्टिवलमध्ये कॅज्युअल लूक हवा असेल तर तुम्ही ब्राइट कलरच्या कुर्तासह जीन्स कॅरी करू शकता.