
शवासन : झोप न लागणे किंवा झोप पूर्ण न होणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन अत्यंत प्रभावी आहे. झोपण्यापूर्वी नियमित शवासन केल्याने तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.

बालासन : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. बालासनामुळे तुमच्या मनावरील तणाव दूर होतो. शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते. त्यामुळे तुम्हाला झोप देखील चांगली लागते.

उत्तानासन : या आसनामुळे तुमच्या पाठीच्या तसेच खाद्यांच्या अनेक समस्या दूर होतात. मनावरील ताण कमी होतो. उत्तानासनामुळे रक्ताभिसरणही सुधारते. रक्ताभिसरण सुधारून चांगली झोप लागते.

विपरित कर्ण आसन : पोटाशी संबंधित समस्यांमुळे कधी-कधी झोप येत नाही. अशा वेळी हे योग आसन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. या योगासनामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते. अकाली केस पांढरे होण्याची समस्या ज्यांना आहे त्यांनी हे आसन केल्यास त्याचा फायदा होतो.

सुखासन : हे आसन मन शांत करते, चिंता, तणाव आणि मानसिक थकवा कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी हे आसन नियमित केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. टीप वरील सर्व माहिती ही सामान्यज्ञानासाठी देण्यात आली आहे. कुठलेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.