
आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे तरूणांसाठी एक उत्सवच असतो. हा व्हॅलेंटाईन वीक 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवसी संपतो. या संपूर्ण आठवड्यामध्ये वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. आज 7 फेब्रुवारी रोजी रोझ डेची खास क्रेझ आहे. रोझ डेला जोडीदाराला गुलाबाचे फुल दिले जाते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला या रोमँटिक दिवशी भेटू शकत नसाल, तर तुम्ही रोझ डेशी संबंधित मेसेज पाठवून त्यांना तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

Valentine's Day

माझे प्रत्येक स्वप्न तू आहेस, जे सत्यात उतरते. तुझ्यासाठी लाखात एक गुलाब आणतो आणि हा गुलाब प्रेमाची सुरुवात बनतो...,तुटलेले फूल सुगंध देतो, गेलेला क्षण आठवणी देतो. कोणी आयुष्यात प्रेम देते, तर कोणी प्रेमात जीव देते. Happy Rose Day

काही जुन्या आठवणी जपण्यासाठी, येणाऱ्या क्षणापासून प्रेम जपून ठेवा, हे क्षण येतच राहतील, फक्त ओठांवर हसू ठेवा. Happy Rose Day...,तुझ्या चेहऱ्याशिवाय मला काही आठवत नाही, मी तुझ्या गुलशनचा गुलाब आहे, तुझ्याशिवाय माझ्यावर कोणाचाही अधिकार नाही.

तुझ्या ओठांवर सदैव गुलाब फुलू दे. देव तुला कधीही दुःखी होऊ देणार नाही. मी तुझा सोबत असो किंवा नसो...पण नेहमीच तु आनंदात राहा. Happy Rose Day