
सध्या भारतात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीत भारतात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र असं असतानाच भारत आपल्या शेजारी राष्ट्रांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस पुरवतोय.

अशाच मदत मोहिमेअंतर्गत भारतानं भूतानलाही लस पुरवली आहे. याच पार्श्वभूमीवर भूतानमधील एका गोड चिमुकलीनं भारताचे आभार मानले आहेत.

या मुलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या मुलाचा क्यूट अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. खेनब येदजिन सेल्डन नावाची एक बालकलाकार या व्हिडिओत आहे.

खेनबनं अतिशय गोड आणि मोहक शैलीत भारताचे आभार मानले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस पाठवल्याबद्दल हा खास व्हिडीओ तिनं तयार केला आहे.