Madhuri Dixit Meets CM: माधुरी दीक्षितने घेतली थेट मुख्यमंत्र्‍यांची भेट, नेमकं कारण तरी काय?

Madhuri Dixit Meets CM: माधुरी दीक्षित ही पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेली होती. आता या भेटीमागे नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 06, 2026 | 7:34 AM
1 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित ही पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेली आहे. आता या भेटीमागचे नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित ही पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेली आहे. आता या भेटीमागचे नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2 / 5

माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये माधुरी, श्रीराम नेने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

3 / 5

डॉ. नेने यांचे एक नवे पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी ते वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यांच्या हा भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5

नेने यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना माझे पहिले पुस्तक '21 Days to Good Health' देताना मला अत्यंत सन्मान वाटत आहे असे त्यांनी म्हटले.

5 / 5

पुढे ते म्हणाले की, सर्वांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि आरोग्यविषयक जागरूकता, आरोग्यसेवेची उपलब्धता व योग्य उपाययोजना यांबाबत लोकांना सक्षम करणे किती महत्त्वाचे आहे, यावर चर्चा करताना मला आनंद झाला; यामुळे आजारांचा प्रतिबंध, तसेच त्यांचे वेळीच निदान आणि उपचार करणे शक्य होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us