
दहशत निर्माण करण्याच्या हेतूने एका टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा-कारच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे.

रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास औरंगाबादमधील किराडपुरा भागात हा प्रकार घडला

रेहाणा सांडू खान यांचा शेख इस्माईल शेख इब्राहिम, शेख उमर शेख इब्राहिम, शेख फारुख शेख इब्राहिम आणि मोबीन यांच्याशी वैयक्तिक वाद आहे. हा वाद अधिकच चिघळला.

नारेगाव येथील आरोपींनी किराडपुरा भागात येऊन दहशत निर्माण करण्याच्या हेतूने किराडपुरा भागातील उभी वाहने फोडली आणि पळ काढला

या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात काही काळ निर्माण झालेला तणाव पोलिसांनी शांत केला

वैयक्तिक वादातून हा प्रकार झाला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करत असल्याची माहिती जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली