देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी 1 लाख 68 हजार 912 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.