Monsoon Update : तारीख लिहूनच ठेवा! गावातल्या नद्या भरून जाणार? या दिवसापासून राज्यात धो धो पाऊस!

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Jun 17, 2026 | 9:15 PM
1 / 5
सध्या भारतावर एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव कायम असताना आता मान्सून पुन्हा वेग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. मान्सून सध्या टप्प्याटप्प्याने पुढे सरकरत आहे.

2 / 5

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

3 / 5

समोर आलेल्या ताज्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 25 जून रोजीपासून ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

4 / 5

त्यामुळे 25 जूननंतर उत्तर भारतात मान्सून सक्रिय होऊ शकतो. मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 ते 1 जुलै या काळात मान्सूनसाठी मुंबई, कोणणात पोषक वातावरण निर्माण होईल.

5 / 5

त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून दाखल होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची सध्याच घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतात बियाणं पेरावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us