
महाराष्ट्राच्या पश्चिमेला ऐटीत पहुडलेला सह्याद्री... महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी वर्षानुवर्षे अरबी समुद्राच्या तटावर उभा असलेला... पावसाळ्यात या सह्याद्री पर्वत रांगेचं सुंदर रूप अधिकच खुलतं...

हिरव्यागार डोंगररांगामधून खळाळत वाहणारे झरे... अन् त्यामुळे निनादणारा आवाज अनुभवनं म्हणजे स्वर्ग सुखच... हिरवागार शालू नेसलेले डोंगर, धबधब्यांच्या पांढ-या शुभ्र फेसाळ माळा गळ्यात घालून सह्यद्रीच्या डोंगर रांगा मिरवत असतात.

पावसाळा सुरु झाला की ट्रेकर्स अन् पर्यटकांची पावलं आपोआपच सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे वळतात. इथला हिरवागार निसर्ग अन् पावसात खुलणारं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं.

निसर्ग कोणत्यीही परत फेडीची अपेक्षा न करता केवळ देत राहातो. सह्याद्रीची डोंगर रांग तुम्हाला देते तो समृद्ध करणारा अनुभव आणि सकारात्मकता... सह्याद्रीची डोंगररांग तुमचं भावविश्व अधिक समृद्ध करते.... त्यामुळे या पावसाळ्यात एक तरी ट्रीप केलीच पाहिजे.

सह्याद्री.... एक स्वर्गानुभूती. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये फिरणं म्हणजे जीवन समृद्ध करणं.... शनिवार- रविवारी जर तुम्ही सह्याद्रीत भटकंती करायला गेलात. तर आठवड्याभराचा कामाचा तणाव या ठिकाणी नाहीसा होईल अन् नव्या उमेदीने तुम्ही पुन्हा कामावर परताल.