AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बेंचवर बसून व्यायाम करायला गेला, पण क्षणात भलतं घडलं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या एक अतिशय मजेदार आणि मूड फ्रेश करुन टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाची चांगलीच फजिती उडाली आहे.

Video | बेंचवर बसून व्यायाम करायला गेला, पण क्षणात भलतं घडलं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
exercise video
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 7:22 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच मजेदार व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. तर काही व्हिडीओंना पाहून आपण चकित होऊन जातो. सध्या एक अतिशय मजेदार आणि मूड फ्रेश करुन टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाची चांगलीच फजिती उडाली आहे.

माणसाचा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

व्हायरल होत अललेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये एका जाड्या माणसोबत घडलेली घटना पोट धरुन हसायला लावणारी आहे. हा माणूस व्यायाम करताना धाडकन पडला आहे. तसेच खाली पडल्यानंतर स्वत:ला सावरत तो मजेदार पद्धतीने पुन्हा व्यायाम करायला लागला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीमध्ये एक माणूस दिसतोय. तो अचानकपणे येऊन एका बेंचवर बसला आहे. तसेच बेंचवर तो फक्त बसला आहे असे नाही. तर बसल्या ठिकाणी त्याने करामती सुरु केल्यायत. तो ज्या बेंचवर बसला आहे; त्याच्यावरच तो व्यायाम करण्याचा प्रयत्न करतोय. आधी तो खाली शांतपणे बसला आहे. त्यानंतर पाय वर करत तो व्यायाम करतोय. मात्र मन लावून व्यायाम करत असताना अचानकपणे तोल गेल्यामुळे हा माणूस थेट खाली पडला आहे. विशेष म्हणजे या अपघातात त्याच्या मानेला दुखापत झालेली असावी.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मात्र, खाली पडल्यानंतर पुढच्याच क्षणी या माणसाने स्वत:ला सावरलं आहे. मला कोणीही पाहिलेले नाही, या अविर्भात राहून त्याने पुन्हा एकदा व्यायाम सुरु केलाय. काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून नेटकरी खूपच हसत आहेत. व्यायामच्या वेडापाई या माणसाची झालेली फजिती पाहून लोटपोट झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

Video: अहमदनगरमध्ये मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक, लोक म्हणाले, अशांना चांगलं चोपलं पाहिजे!

Video: पिल्लाचे रक्षण करणाऱ्यांना हत्तीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, हत्ती खूप हुशार असतात!

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप