स्विमिंग पुलसाठी खड्डा खोदला अन् झाला करोडपती, जमिनीत सापडला सोन्याचा खजिना!

एका व्यक्तीला घराच्या परिसरात स्विमींग पुल बांधायचा होता. मात्र खड्डा खोदताना त्याचं नशीब पालटलं आहे. त्याला सोन्यचा खजिना सापडला आहे.

| Updated on: Nov 06, 2025 | 9:50 PM
1 / 5
सध्या एक अजब आणि मोठी माहिती समोर आली आहे. फ्रान्समध्ये एका व्यक्तीला घराच्या परिसरात स्विमिंग पुल बाधांयचा होता. मात्र स्वमिंग पुलचे काम करत असताना त्याला चक्क सोन्याचा खजिना सापडला आहे

2 / 5
त्याला मिळालेल्या सोन्यच्या खजिन्याचे मूल्य तब्बल 8 लाख डॉलर असल्याचे बोलले जात आहे. स्विमिंग पुलच्या कामासाठी त्याने घराच्या परिसरात खोदकाम चालू केले होते. खोदकाम चालू असतानाच त्याला हा बहुमुल्य खजिना सापडला आहे.

3 / 5
या खजिन्यामुळे त्याचे नशिबच बदलले आहे. फ्रान्समधील न्यूज एजन्सी एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्युविले सुर साओन या भागातील अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. हा सोन्याचा खजिना सापडताच त्याने तत्काळ प्रशासानाला याची कल्पना दिली.

4 / 5
आता प्रशासनाने हा बहुमुल्य खजाना त्या व्यक्तीकडेच ठेवण्यास मजुरी दिली आहे. पुरातन जागेवर हा खजिना सापडलेला नाही. त्यामुळे सोन्याचा खजिना त्या व्यक्तीला देऊन टाकण्यात आला.

5 / 5
या खजिन्यामध्ये पाच सोन्याची बिस्किटे तसेच अनेक सोन्याचे शिक्के मिळालेले आहेत, असे सांगितले जात आहे. हा खजिना ज्या जागेत सापडला, त्या जागेच्या मूळ मालकाचे निधन झालेले आहे. त्यामुळे सध्या या जागेचा जो मालक आहे, त्यालाच हा खजिना देण्यात आला आहे.