
संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्यादर्शनासाठी पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले होते. यावेळी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेत त्यांना श्रद्धाजंली वाहिली.

यावेळी अभिनेत्री जया बच्चन यांनीही पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी गीतकार , लेखक जावेद अख्तर यांनी पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतरपंडित शर्मा याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्याचे सांत्वन केले