बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सर्वत्र सुरु आहे. बाजारपेठा विविध सजावटीच्या वस्तूंनी भरुन गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे.

गणेश उत्सवाची सर्वत्र धामधुम सुरु असताना आता गणपतीचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. यंदा देखील बाजारात सजावटीच्या साहित्यात चायना मालला मागणी आहे.

गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे.बाप्पाच्या सजावटीसाठी नवनविन साहित्य बाजारात दाखल झाले आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी चायनिज फुलं देखील मिळत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत सजावटीच्या साहित्याच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. तरीही आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी लोकांची झुंबड उडाली आहे…

गेल्यावर्षीच्या तुलनेत सजावटीच्या साहित्याच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. तरीही आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी लोकांची झुंबड उडाली आहे…