
शिवसेना नेते व राज्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते दुपारी अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं.

यावेळी इस्कॉन मंदिराच्या वतीने भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा व धार्मिक पुस्तके भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते

इस्कॉन मंदिरात आदित्य ठाकरे याच्या हस्ते आरतीही करण्यात आली. यावेळीत्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. आरतीसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील प्रमुखांशीदेखील चर्चा देखील केली.

इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना नेते अनिल देसाई देखील उपस्थित होते