PHOTO: सरकारने झेड सिक्युरिटी काढली; मनसेकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खास अंगरक्षक
राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. | MNS Raj Thackeray

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.
- राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत.
- मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.
- राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत राज यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
- राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारकडून वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे.
- या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली होती. आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटले होते.
- मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.
- आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित असतील. यावेळीसुद्धा राज यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील.
- मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.








